Breaking News

लोणी सय्यदमीर येथील विष्णू पवार भारतीय सैन्य दलातुन सेवानिवृत्त गावकऱ्यांनी केला सत्कार

त्याचप्रमाणे गावातील ह भ प,रामदास महाराज रक्ताटे,ह भ प बाबा महाराज वाळके,सरपंच रेनकू बेलेकर,पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष वाळके,पोलीस पाटील बाबासाहेब पाटील निंबाळकर,ग्रा.प.स. संतोष पाटील वाळके,माजी सरपंच उद्धव पाटील वाळके,भिवा सासवडे,संतोष व्यवहारे,मोहन वाळके,सोमनाथ मेजर बेलेकर,निळकंठ रक्ताटे,गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तात्या वाळके यांनी केले तर आभार सरपंच रेनकू बेलहेकर यांनी मानले.याप्रसंगी सुभेदार मेजर बापूराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की भारतीय सैन्य दलामध्ये काम करण्यासाठी मला मोठे भाग्य लाभले.देशाच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना,भारतीय सैन्य दला मध्ये जाण्याचा योग ज्यांच्या नशिबी येतो ते खरच पुण्यवान असतात या देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभलं याच्यासारखा दुसरा आनंद जीवनात कोणताही असू शकत नाही.

गावातील तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की तरुणांनी,व्यायाम करून व्यसनाच्या आहारी न जाता शरीर संपत्ती मजबूत करून देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यदलामध्ये भरती झाले पाहिजे.भारतीय सैन्यदलामध्ये भरपूर संधी आहेत या संधीचा युवकांनी योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गावाचे आपल्या देशाचे नाव रोशन करावे.जय हिंद.

No comments