Breaking News

अ‍ॅन्टीजन टेस्टसाठी व्यापार्‍यांना मदत करणार शाहु नगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष किशोर पिंगळे यांची माहिती

बीड :  जिल्हा प्रशासनाने व्यापार्‍यांना अ‍ॅन्टीजन टेस्ट बंधंनकारक केली आहे. व्यापार्‍यांचा सर्व सामान्य नागरिाकांशी दररोजचा संपर्क असल्यामुळे सदरील टेस्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. त्यानुसार शाहु नगर व्यापारी असोसिएशन समितीद्वारे व्यापार्‍यांना टेस्ट संदर्भातील फॉर्म भरुन देत त्यांना अ‍ॅन्टीजन टेस्टसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती शाहु नगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यासह शहरात कोरोना विषाणू बाधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. व्यापार्‍यांचा अधिकाधिक लोकांशी संपर्क येत असल्यामुळे शाहु नगर भागासह शहरातील इतर दुकानदारांनी अ‍ॅन्टीजन करुन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन शाहु नगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी केले आहे.

15 मार्च पर्यंत अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी नुकतेच दिले आहेत. व्यापार्‍यांनी अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेतल्याशिवाय आपली दुकाने सुरु करता येणार नाहीत ही बाब लक्षात घ्यावी. अ‍ॅन्टीजन टेस्ट शिवाय दुकाने सुरु ठेवणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईही होणार आहे. परंतु, कारवाई ऐवजी नागरिकांची व स्वतःची सुरक्षितता ओळखत दुकानदारांनी 15 मार्च पुर्वी अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन शाहु नगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी केले आहे. तसेच व्यापार्‍यांना टेस्ट संदर्भातील काही माहिती हवी असेल तर तात्काळ शाहू नगर व्यापारी असोसिएशन समितीशी संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले आहे.

मास्क, सॅनीटयझरचा वापर करावा

कोरोना विषाणू पुर्णतः गेलेला नाही, आजही रुग्णांची संख्या वाढत आहेत. काहीजण तर कोणतेही काळजी न घेता बिनधास्तपणे वावरत आहेत. नागरिकांनी स्वतःची, आपल्या कुटूंबाची व समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून बाहेर जाताना तोंडाला मास्क व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही किशोर पिंगळे यांनी केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी टेस्टसाठीची तारीख वाढवून द्यावी

15 मार्च पर्यंत अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहे. बीड शहरातील व्यापार्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे अ‍ॅन्टीजन टेस्टला कदाचीत उशीर लागु शकतो. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अ‍ॅन्टीजन टेस्टसाठीची तारीख 20 मार्च करावी अशी मागणी किशोर पिंगळे यांनी केली आहे.

No comments