Breaking News

कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा


माजलगांव :  तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ऊस लागवड आसलेले बटईदार शेतकरी यांनी पवारवाडी येथील जय महेश शुगर प्रा.लि. या कारखाण्याच्या शेतकीय अधिकारी यांना ऊस तोडणीसाठी वारंवार विनंती केली असता येथील शेतकी आधिकाऱ्याने शेतकऱ्यांना आर्वाच्य भाषा वापरून तुमचा ऊस वाळत असेल तर मि काय करू. त्याच ऊसामध्ये जाऊन पेटवून घेऊन मर असे बोलल्याचा आरोप निवेदनामध्ये नमूद केला असून सदरील निवेदन दि ०५ मार्च शुक्रवार रोजी तहसिल कार्यालयास शेतकऱ्याने दिले असुन आत्मदहन करत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

यासंदर्भात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात  निवेदनकर्ते मुक्तीराम दामोधर आबुज यांनी म्हटले आहे की, मि माझ्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरिता राम पिंपळगांव या ठिकानी बटईने शेती केली आसून त्यामध्ये ऊस पिकाची लागवड केलेली आहे

त्याची नोंद सप्टेंबर २०१९ ला जय महेश शुगर लि. पवारवाडी येथे केलेली आहे .सदरील ऊस तोडणी करिता कारखान्याकडे वारंवार चकरा मारत ऊस तोडणीची विनंती केली आहे त्या दरम्यान ऊस तोडीसाठी शेतकी अधिकाऱ्या कडून मला आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी मि दिनांक ०५ मार्च शुक्रवार रोजी शेतकी अधिकारी श्री.कदम यांच्याशी संपर्क साधला असता मला अर्वाच्य भाषा वापरत म्हटले की तुझा ऊस नाही गेला तर मि काय करू तु जा अन त्याच शेतामध्ये जाऊन स्वतःला पेटवून घे असे बोलले असल्याने मि दिनांक ०७ मार्च रोजी शेतकी अधिकारी कदम यांच्या म्हणण्या नुसार शेतातील ऊस पेटवून आत्मदहन करणार आहे असे निवेदना मध्ये नमूद केले असून आशा स्वरूपाचे निवेदन शेतकरी मुक्तीराम आबूज यांनी तहासिल कार्यालयास लेखी निवेदन दिले आहे.

No comments