Breaking News

सुनसान रस्ते आणि रस्त्यावर फक्त पोलीस : कोरोनाचा जिल्ह्यात आकडा वाढतोय : खबरदारी आवश्यक

 

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात लॉक डाऊनमुळे रस्ते सुनसान पडलेले आहेत. रस्त्यावर पोलीस आणि गस्त घालणाऱ्या त्यांच्या गाड्याशिवाय कुणाचाही वावर दिसत नाही.

 

केज तालुक्यात लॉक डाऊनचा प्रभाव दिसत असून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक करणारी एसटी बंद आहे. त्यामुळे रस्त्यावर शेतीमाल व मालवाहतुक करणारी वाहने व काही खाजगी वाहने यांची तुरळक वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर केवळ पोलिसांच्या गस्त घालणारे वाहने व कर्तव्यावरील पोलीस आणि त्यांना सहाय्य करणारे गृह रक्षक दलाचे जवान, महसूल, नगर पंचायत व पंचायत समितीचे कर्मचारी हे दिसून येत आहेत.   

मात्र लॉक डाऊन असले तरी काहीजण मात्र मुद्दाम रस्त्यावर येऊन किंवा दुचाकी पळत असल्याचे दिसून येत आहे. अशा नियमांचे व लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायद्या नुसार स्वतःच्या व इतरांच्या जीविताची काळजी न घेता नियम भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल व्हायला हवेत. तरच वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तुटेल आणि कोरोना आटोक्यात येईल.  

No comments