Breaking News

लॉकडाऊन शिथिल करा; छोटेमोठे व्यावसायिक, गोरगरिबांना जगू द्या


आम आदमी पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बीड :  10 दिवसांसाठी लागू करण्यात आलेला बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन हा जीवघेणा असून कोरोनापेक्षा जास्त बळी हा लॉकडाऊन मूळे जात आहे. आम आदमी पक्षाने बीड शहरातील 500 पेक्ष्या व्यापाऱ्यांच्या सह्या घेऊन लॉकडाऊन लागु करू नये अशी मागणी करून देखील या मागणीकडे दुर्लक्ष करत लॉकडाऊन लादला गेला असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी म्हंटले आहे. 

  छोटेमोठे व्यापारी,व्यावसायिक, हातावर पोट असणारे, भाजीपाला उत्पादक, शेतकरी, फळविक्रेते यांच्यावर आत्महत्येची वेळ आलेली असून हा लॉकडाऊन वापस घ्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी त्यांनी बीड शहरातील विद्युत व्यवस्था सुरू करण्याची, नगरपरिषदेने संपूर्ण शहर स्वच्छ करून घ्यावे असेही म्हंटले आहे.
No comments