परळी येथे धम्म केंद्र विकसित करण्यासाठी १५.५१ कोटी, तर बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १.३२ कोटी रुपये मंजूर
परळीतील आंबेडकरी अनुयायांकडून ना. धनंजय मुंडे यांचा सहृदय सत्कार
तुम्ही मागाल ते पुरवणार - धनंजय मुंडे
परळी वैजनाथ : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघातील आंबेडकरी अनुयायांना दिलेला शब्द पाळत शहरातील प्रभाग क्र. ३ मधील नगर परिषदेच्या जागेत बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यासाठी १५ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी तसेच मतदारसंघातील बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारणी साठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर केला आहे.
परळीतील आंबेडकरी अनुयायांनी आज (दि. १२) परळी येथील शासकीय विश्रामगृहात धनंजय मुंडे यांचा फेटा बांधून सहृदय सत्कार करून त्यांचे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले.
यावेळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, प्रा. डॉ. विनोद जगतकर, माधव ताटे, सोपान ताटे, महादेव रोडे, अनंत इंगळे, महेंद्र रोडे, नितीन रोडे, भैयासाहेब आदोडे, आबासाहेब आदोडे, विजय कुमार गडले, पंडीत झिंजुर्डे, विक्रम मस्के, वसंत बनसोडे, महादेव रोडे, हणुमंत वाघमारे, सुभाष वाघमारे, नगरसेवक केशव गायकवाड, माजी नगरसेवक रवी मुळे, प्रितम जाधव, प्रा.शाम दासुद, आर एच आण्णा व्हावळे, रतन आदोडे, बापु गायकवाड, मस्के बालाजी, राज हजारे, शिलभद्र ताटे, आंबादास रोडे, बालासाहेब जगतकर, आशोक जगतकर विजय हजारे, आतिश आदोडे, अमर रोडे, मुक्ताराम गवळी, अनिल काबंळे, धम्मा अवचारे, प्रताप समिंदरसावळे, लक्ष्मण हजारे, बुवाजी आदोडे, आमोल रोडे, प्रमोद रोडे आदी बौद्ध बांधव उपस्थित होते.
परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये १५.५१ कोटी रुपये खर्च करून बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यात येत आहे. तसेच बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथील दुर्दैवी घटनेनंतर तेथील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत शब्द दिला होता त्याप्रमाणे स्मारक उभारणी साठी १.३२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही विकासकामांच्या बाबतीत मतदारसंघात निधीची कमतरता भासू देणार नाही, तुम्ही मागाल ते मी पुरवणार असे यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले.
No comments