Breaking News

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ; माळेगाव येथील दुर्देवी घटना

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील माळेगाव येथे बोबडेवाडी येथील एक पारधी समाजातील महिला विहिरीत पडून मरण पावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २६ मार्च रोजी केज तालुक्यातील माळेगाव येथे युसुफवडगाव कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला अरुण शिवाजीराव लोकरे यांच्या विहिरीत एका महिलेचे प्रेत तरंगत असल्याची माहिती युसुफवडगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर प्रेत विहिरीच्या वर काढले. या बाबत अधिक माहीती घेतली असता मयत महिलेचे नाव सुंदराबाई साहेबराव काळे वय ६० वर्ष रा. बोबडेवाडी ता. केज येथील असून ती वेडसर असल्याचे समजते. 

या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि संदीप दहिफळे व विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
No comments