Breaking News

वाढीव थकित बीलासंदर्भात तक्रार निवारण करण्यासाठी लवकरच शिवसंग्राम भवन येथे कॅम्पचे आयोजन करणार अधिक्षक अभियंता, कोळप यांचा शब्द - अनिल घुमरे


बीड : 
शहरासह जिल्हाभर थकित वीज बील न भरल्यामुळे महावितरण कंपनीने वसुली मोहीमे अंतर्गत शहरातील घरगुती, व्यापारी, शेतकरी यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम चालू होते. मात्र काल विधान भवतनात झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती दिली असतानाही काही भागात कनेक्शन तोडण्याचे काम चालूच होते. त्याअनुषंगाने शिवसंग्रामकडे शहरातील लोकांच्या तक्रारी आल्यानंतर शिवसंग्रामच्या वतीने चौकशी केली असता, विभागास आदेश प्राप्त नसल्याचे कारण पुढे करत, कनेक्शन तोडणी अद्यापही चालूच होती.

त्यामुळे अधिक्षक अभियंता, महावितरण बीड यांना या संदर्भात शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शहर प्रभारी अनिल घुमरे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, सुनिल शिंदे, अक्षय माने, नितिन आगवान, गणेश धोंडरे, जाकीर हुसेन, अमजद पठान, शेख लालाभाई, राहुल गायकवाड, सुरेश बावळे, संतोष पवा, मनोज कदम, भागवत गायकवाड,  ओम बडे यांनी यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. शासनाच्या सुचनेचे पालन करुन शहरातील वसुली मोहीम तात्काळ थांबवावी व  वाढीव बीला संदर्भातील प्रकरणे तातडीने सोडवावीत अशी मागणी केली यावेळी करण्यात आली. तेव्हा अधिक्षक अभियंता, कोळप साहेब यांनी वाढीव बीलासंदर्भात तक्रार निवारण करण्यासाठी शिवसंग्राम भवन, बीड येथे कॅम्पचे लवकरच आयोजन करुन सदर प्रकरणे निकाली काढण्याबाबत शब्द दिला आहे.

No comments