Breaking News

मोरे हत्या प्रकरणात आरोपीच्या अटकेसाठी महिलांचा ठिय्या

अंबाजोगाई :. गणेश मोरे या तरुणाची निर्घृण हत्या करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करा म्हणत मोरेवाडी येथील शेकडो महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला असून पकडलेल्या आरोपींना बाहेर आणा म्हणत फरारी मुख्य आरोपींना तात्काळ जेरबंद करा, तेव्हाच आम्ही इथून उठू, अशी भूमिका या महिलांनी घेतली.

अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या मोरेवाडी येथे रात्री सात वाजण्याच्या सुमारास गणेश सुंदर मोरे या 20 वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करत निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, परंतु यातील मुख्य आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आज मोरेवाडी येथील महिला अंबाजोगाई पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसल्या आहेत. जे आरोपी पकडले आहेत त्यांना बाहेर आणा, अशी संतप्त घोषणाबाजी करत मुख्य आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका संबंधित महिलांनी घेतली आहे.
No comments