Breaking News

एस.बी.इंजिनिअर्सचा भोंगळ कारभार उघड..!


राजुरी-शिरूर-चिंचपुर रस्ता दुपदरीकरणात अनियमितता

बीड :  हायब्रीड अॅन्यूईटी प्रकल्पाअंतर्गत 722 कोटी पैकी  रा.मा.59 याचे 125 कोटी खर्चाचे दुपदरीकरनाचे काम सुरू आहे.या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे गौण खनिज मुरूम व दगड खूप मोठ्या प्रमाणात संबंधित गुत्तेदाराने चोरून वापरला आहे. गौण खनिजापोटी स्वामित्वधन रक्कम कमी भरणा करून शिरूरचे तहसीलदार भेंडे स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून पन्नास ते साठ हजार ब्रास अधिकचे मुरूम व दगड उत्खनन केलेले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी व ETS मशीन द्वारे मोजणी करून दोषींवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि खान खनिजे विनियं व विकास अधिनियम 1957 च्या तरतुदीनुसार संबंधित कंपनी एजन्सी इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी विभागीय आयुक्ताकडे केली आहे.

तसेच झापेवाडी तालुका शिरूर कासार येथील बेकायदेशीरपणे दगड खादान, स्टोन क्रेशर, डांबर प्लांट एक ते दिड वर्षापासून उभारण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सदरील प्लांट उभा करताना गाव, शाळा, पाण्याची टाकी व राज्य महामार्ग या पासून पाचशे मीटर अंतरावर उभा करण्याचा नियम आहे तर राष्ट्रीय महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर उभा करण्याचा नियम आहे परंतु झापेवाडी येथे उभारण्यात आलेला प्लॅन च्या शेजारी वस्ती असून लागलीच वनविभागाचे क्षेत्र जोडून आहे सदरील प्रकरणी काही अनुचित प्रकार घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी ,तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ ते जबाबदार राहतील अशी तक्रार मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद दिली आहे. 

कल्याण टोल इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड इंदोर अंतर्गत एस.बी. इंजिनियर औरंगाबाद मार्फत काम सुरू असून संबंधित गुत्तेदाराणे गौण खनिज विभाग जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कमी स्वामित्वधन भरणा केलेला आहे तसेच शिरूर तहसीलदार भेंडे यांना हाताशी धरून जास्त प्रमाणात मुरूम व दगड उत्खनन करून गौण खनिज चोरी केलेली आहे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना बेकायदेशीर प्लांट  उभा करून काम सुरू आहे . प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना यांची सखोल चौकशी करावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथे तक्रार दिली.  सार्वजनिक बांधकाम मंडळ   उस्मानाबाद यांनी सदरील कंपनीला आजपर्यंत दोन बिल दिलेले आहेत त्या बीलातील कॉन्टिटी व त्याची रॉयल्टीची माहितीची चौकशी करण्यात यावी तसेच सदरील रस्ता हा इस्टिमेट प्रमाणे व ड्रॉइंग (cross section) प्रमाणे झाला आहे का? याची सखोल तपासणी करावी. करण या रस्त्याच्या असणारे स्वतंत्र अभियंता यांचे कसलेही लक्ष नाही रॉयल्टी भरली का नाही हे न तपासता बिल अदा करण्यात आले आहे व जुन्या रोड वरील पूर्ण खड्डे पडलेले आहेत ,जागो जागी  खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची saefty वावरलेली नाही रोडच्या कामामध्ये निकृष्ट दरजेच सामग्री वापरलेली आहे म्हणून स्वतंत्र अभियंता यांच्यावर कार्यवाही करावी. या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
No comments