Breaking News

लॉक डाऊन मध्ये चोर झाले सक्रिय ! केजमध्ये शिक्षकाचे घर फोडले : टीव्ही आणि होम थिएटरची चोरी


गौतम बचुटे । केज

केज येथे एका शिक्षकाचे घरफोडी झाली असून घरातील एलईडी टीव्ही, होम थिएटर व पितळेची भांडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, केज येथील समता नगर मध्ये राहणारे शिक्षक अविनाश रामचंद्र गाताडे हे त्यांच्या केज येथील घराला कुलूप लावून दि.२४ मार्च रोजी सर्व कुटुंबियां सोबत त्यांच्या आईच्या मासिकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काळेगाव ता. केज येथे मूळ गावी गेले होते. त्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील फ्युटेक कंपनीची एलईडी टीव्ही, सॅमसंग कंपनीचे होम थिएटर आणि पितळेची भांडी असा एकूण १७ हजार रु किमतीचा मुद्देमाल चोरून नेल. याची माहिती त्यांना त्यांच्या चुलतीने दिली. 

दि. २७ मार्च रोजी सहशिक्षक अविनाश गाताडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १४१/२०२१ भा. दं. वि. ४५४, ४५७ व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धेश्वर डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.
No comments