Breaking News

केज कोविड केअर सेंटर मध्ये तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नायब तहसीलदार धस हे नियंत्रण अधिकारी


गौतम बचुटे केज

जिल्ह्यात व केज तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने केज येथे कोरोना केअर सेंटर चालू केले आहे. जिल्ह्यातील केअर सेंटर मध्ये सुविधा बाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सदरील केअर सेंटर मध्ये संक्रमित रुग्णांच्या तक्रारी असतील; त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नायब तहसीलदार लक्ष्मण धस हे केज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पिसेगाव येथील कोविड केअर सेंटरवर नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यासाठी निर्देशीत केले आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी आदेश दिले आहेत. 

नियुक्त नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी त्यांना नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज करावे. आरोग्य विभाग व इतर विभागांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. कोणत्या प्रकारची हयगय अथवा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये. असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments