Breaking News

आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन करण्याची आ. बाळासाहेब आजबे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


आष्टी : आष्टी तालुका बार असोसिएशन व तालुक्यातील सामान्य जनतेची अनेक दिवसांपासून आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन व्हावे अशी मागणी आहे त्या अनुषंगाने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समक्ष भेटून आष्टी,  तालुक्यासाठी आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन करावे अशी मागणी पात्राद्वारे केली असुन मुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबत  सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले असल्याचे बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

  आष्टी तालुक्यामध्ये 122 ग्रामपंचायत व 55 वाड्या-वस्त्या तांडे आहेत , तसेच जिल्ह्याचे ठिकाण हे आष्टी शहरापासून 100 किलोमीटर तर आष्टी तालुक्यातील शेवटचे गाव 130ते140 किलोमीटर अंतरावर आहे अशा परिस्थितीत पक्षकारांना सत्र न्यायालयातील कामासाठी बीड येथे जाणे गैरसोयीचे होते तसेच सत्र न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या फायलिंग सुद्धा आष्टी न्यायालयात होत आहेत  व आष्टी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी   पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे व लोकांची गैरसोय टाळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याबाबत लवकरच योग्य तो सकारात्मकनिर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

No comments