Breaking News

बाजीप्रभू नगर मधील धापा व नाल्यावरील संरक्षक भिंत तात्काळ दुरुस्त करावी - नगरसेवक प्रा. पवन मुंडे

परळी : शहरातील प्रभाग 13 मधील मारोती मंदिरा समोरील नाल्यावरील धापा पूर्णपणे कोळमडला असून तो तात्काळ दुरुस्त करावा तसेच तेथील नाल्यावरील संरक्षक भिंत अनेक दिवसांपासून पडली असून त्या मुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तरी न प प्रशासनाने तात्काळ नवीन भिंत व धापा तयार करावा अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

 

शहरातील बाजीप्रभू नगर मधील मुख्य रस्त्यावरील एन वर्दळीच्या रस्त्यावरील धापा पूर्णपणे पडला असून ,  नागरिकांना येण्या-जाण्यासाठी सदरील रस्त्यावरून वागणे अवघड झाले आहे.तसेच त्याच परिसरातील नाल्यावरील संरक्षक भिंत पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून , डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी निगरगट्ट नगरपालिका प्रशासनाने तात्काळ नवीन धापा व संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

No comments