Breaking News

कोरडेवाडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद  करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.२२ मार्च सोमवार रोजी रात्री ९:०० ते १२:०० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. या बाबत मुलीच्या पालकाच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.




No comments