Breaking News

लातूर बार्शी रोडवर झालेल्या अपघातात केज तालुक्यातील चालक ठारगौतम बचुटे । केज 

लातूरहुन माल घेऊन निघालेल्या 407 टेम्पोचा एका अन्य वाहना बरोबर अपघात होऊन केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

           अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील धनराज बब्रुवान मोटे हा त्याच्या टेम्पो मध्ये लातूरहून माल घेऊन लातूर बार्शी रोडने निघाला होता. मात्र त्याचे वाहन लातूर पासून कांही अंतरावर आले असता गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात्रा जवळ समोरून लोखंड घेऊन येणाऱ्या एका पिकअप सोबत अपघात झाला. अपघात प्रचंड भीषण असल्या कारणाने धनराज मोटे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर त्याच्या सोबत असलेला अन्य एकजण जखमी झाला असून त्याला दवाखान्यात हलवण्यात आले आहे. तर पिक अप चा चालक बेशुद्ध असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना शुक्रवारी दि.२६ रोजी दुपारी घडली असून सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.  दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच गातेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विलास नवले हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.


No comments