Breaking News

आदर्श पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार व सपोउनि महादेव जाधव यांना श्रद्धांजली

गौतम बचुटे । केज   

दिवंगत जेष्ठ पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि सहाय्यक फौजदार महादेव जाधव यांना आदर्श पत्रकार समितीच्या वतीने केज येथील शासकीय विश्राम गृहावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तथा तत्कालीन केज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले महादेव जाधव यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. त्या दोघांना आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. हनुमंत भोसले आणि गौतम बचुटे यांनी पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि महादेव जाधव यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.   प्रसंगी अध्यक्ष अशोक सोनवणे, प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे, धनंजय देशमुख, गौतम बचुटे, महादेव काळे, प्रकाश मुंडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
No comments