Breaking News

मोरदरा परिसर पर्यटन विकासासाठी आम्ही भरीव कामे करून दाखवली आत्ता सत्ताधारी नेत्यांनी विकास करून दाखवावा - रमेश पोकळे


बीड : कोळवाडी ता जि बीड येथील निसर्गरम्य मोरदरा परिसर व गंगाभारती महाराज यांचा समाधी परिसर  विकासासाठी आम्ही सतत शासनाकडे पाठपुरावा करून  तत्कालीन पालकमंत्री  पंकजाताईसाहेब मुंडे यांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला होता व मोरदरा  परिसरातील उर्वरित विकासकामे करण्यासाठी आणखी 3.50 कोटी रुपये चा विकास आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता.

मोरदरा परिसरात भव्य  सभामंडप , सिमेंट रस्ता ग्रील पेव्हर बाॅल्क, वन चेतना केंद्र, लहान मुलांनसाठी गार्डन पार्किंग व्यवस्था, पर्यटक यांना बसण्यासाठी टाॅवर ओटे  यापैकी काही कामे पुर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे राज्य शासनाने  निधी अडवून ठेवल्याने अपुर्ण आहेत.

तेव्हा विद्यमान शासनातील पालकमंत्री व बीडचे आमदार  माजी मंञी माजी आमदार यांनी मोरेश्वर संस्थान परिसर विकासात आडकाठी न आणता मंजूर केलेला निधी उपलब्ध करून द्यावा व राज्य शासनाकडे पाठवलेला 3.50 कोटी रुपये चा  विकास आराखडा मंजूर करून घेण्यासाठी आपली राजकीय शक्ती वापरावी. सत्तेच्या काळात  आम्ही सतत पाठपुरावा करून मोरदरा परिसरात अनेक भरीव  विकासकामे करून दाखवली आहेत आत्ता राज्य सरकार मध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी विकास कामे करून दाखवावीत असे आवाहन अटल जनसेवक रमेशभाऊ पोकळे यांनी भाविक भक्त व परिसरातील जनतेच्या वतीने केले आहे.Zzzzzzzzzzzzz

No comments