Breaking News

महिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते - प्राचार्य डॉ.निंबोरे

आष्टी : आई आपल्याला जन्म देते. आपल्यावर संस्कार घडवते. त्या संस्कारातून आपण घडत जातो.जगात अनेक संकटांना सामोरे जाण्याचं बळ त्या संस्कारातून आपल्याला मिळत जाते.जगात अनेक कर्तृत्वान महिला इतिहास घडवून गेल्या.राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी,मदर टेरेसा,कल्पना चावला या आणि अशा अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवले.आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे प्रकर्षाने  स्मरण होत आहे.महिला क्षणाची पत्नी,अनंत काळाची माता म्हणताना ,दोन्ही भूमिकांना तितक्याच सक्षमपणे सामोरी जात असते.आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते.

असे विचार प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी व्यक्त केले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यालयीन  अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.शोभा नरोटे, लीला शिरोळे यांनीही आपले मौलिक विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रोहिणी कांबळे यांनी केले. प्राचार्य डॉ.निंबोरे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.शुभांगी खुडे यांनी केले.यावेळी उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे उपस्थित होते.

No comments