Breaking News

एआयएमआयएम लॉक डाऊन विरोधात;जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार - ॲड. शेख शफिक भाऊ


कोरोना संसर्ग विषयक गैरसमज दूर करा ! 

बीड : जिल्हा प्रशासनाने यावेळी पहिल्यांदा 13 ते 18 मार्च पर्यंत संध्याकाळी 07.00 ते सकाळी 07.00 पर्यंत असा 12 तासांचा लावलेला लॉकडाऊन हा यापुढे ही वाढविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी काढले असून हा आदेश सर्वसामान्यांच्या जीवावर उठणारा आहे. यापुढे आता अशा प्रकारे लॉक डाऊन लावून सर्वसामान्यांचा अंत पाहू नये. एआयएमआयएम पक्ष लॉक डाऊन विरोधात असून याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लवकरच चर्चा करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट शेख शफीक भाऊ यांनी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, जिल्हा प्रशासनाने  जो आदेश पारित केला आहे तो जनतेत भीती वाढवणारा आहे. प्रशासनाकडून लॅाकडाऊन लावायचा की नाही, ही विचारणा केलेली आम्हाला माहित आहे. जनता मास्क लावत आहे. तरीही लॉक डाऊन च्या आदेशामुळे जनतेमध्ये भीतीयुक्त चर्चा होताना दिसत आहे. यामुळे सामान्य व्यापारी, हातावर पोट भरणारे, चांभार, न्हावी, किरकोळ दुकानदार, चहा हॅाटेल चालक, खानावळ चालक, रिक्षा चालक-मालक, फळविक्रेते बागवान,  भंगार विक्रेते, सामान्य माणूस ज्याचे हातावर पोट आहे, जो रोजंदारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अगोदरच कोलमडून गेला आहे. 
लॅाकडाऊनमुळे शेतक-याला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे त्याच्या शेतातील वर्षभर मेहनत करुन पिकवलेला भाजीपाला, फळफळावळ बेभाव जात आहे. याशिवाय बाजार बंदी करून शेतीतला माल कुठे अन् कसा विकावा ? याचा पर्याय देणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात पक्षाने शहरातील हजारो लोकांना रोज जेवण दिलेले आहे. तसेच पक्ष नेहमीच प्रशासनासोबत सुद्धा राहिलेला आहे. यावर्षी जर पुन्हा गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती लॅाकडाऊन मुळे निर्माण करण्यात आली तर ती जनतेला परवडणारी नसेल. यावर पक्ष ठाम आहे. लोकांना लॅाकडाऊन परवडणार नाही. म्हणून पक्ष याचा विरोध करीत आहे. लॉक डाऊन ऐवजी प्रशासकीय यंत्रणे मार्फत मास्क वाटप करावे, नियम सांगावेत, कडक निर्बंध लावावेत. मात्र बंद स्वीकारले जाणार नाही. असे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांनी म्हटले असून गेल्यावर्षी सारखे लॉक डाऊन पुन्हा लावण्यात येऊ नये. याकरिता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.No comments