Breaking News

शिरुर शहर पुर्णपणे बंद!


शिरूर कासार : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि.२६ मार्च ते ४ एप्रील पर्यंत बीड जिल्ह्यात कोरोणा संसर्ग रोगाच्या साथीमुळे लाॕकडाऊन करण्यात आले आहे.शुक्रवारी पहिल्याच दिवशी शहरामध्ये काटेकोरपणे लाॕकडाऊनचे पालन केले.दवाखाने,मेडीकल सोडता सर्व शटर डाऊन होते.

कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शिरुरसह संपुर्ण बीड जिल्हा हा लाॕकडाऊन करण्यात आले आहे.गुरुवारी सायंकाळी व्यापाऱ्यांनी एकञ येत निवेदनव्दारे बंदला विरोध दर्शवला होता.पण शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या नियमामध्येच दुकाने उघडण्यात आली.व नंतर बंद करण्यात आले. या पार्श्वभुमीवर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी पोलीसांचा चोख बंदोबंस्त ठेवला होता.शहरातील प्रत्येक चौकात जागोजाग पोलीस तैनात करण्यात आले होते.त्यामुळे कोठेही अनूचित प्रकार घडला नाही.


पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी,व्यापाऱ्यांनी काटेकोर पणे पालन केले आसल्याचे पो.नि.माने यांनी सांगितले. तसेच शिरुर शहरासाठी तिन व रायमोहासाठी दोन अश्या वेग-वेगळ्या पाच पथकाची नेमनुक करण्यात आली आहे.तर ग्रामीण भागामध्ये तलाठी,ग्रमसेवक यांच्यावर जिम्मेदारी आसल्याचे शिरुरचे तहसिलदार तथा दंडाधिकारी श्रीराम बेंडे यांनी सांगितले.यामुळे सध्यातरी शिरुरमध्ये पहिल्या दिवशी बंदचे तंतोतंत पालन करीत आसल्याचे दिसत आहे.No comments