Breaking News

नवतरुणांनी शारीरिक व्यायामसह निर्व्यसनी बनावे -दिलीपराव कोमटवार


दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे उन्हाळी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने  मंगळवारी करण्यात आले या प्रसंगी नव तरुणांनी शारीरिक व्यायामा सह निर्व्यसनी बनावे असा सल्ला स्पर्धेचे अध्यक्ष माजी सरपंच दिलीपराव कोमटवार यांनी उपस्थितांना दिला. 

 या स्पर्धेचे उदघाटन   मजलगाव छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिलीपराव कोमटवार, संतोष यादव, माजी जि प सदस्य विलासराव बड़े, सरपंच अजय कोमटवार, सरपंच श्रीनिवास मोरे,सेवा सह सोसायटी चेअरमन राम उबाळे, शिवसेना नेते नारायण चांदबोधले, संजय शिंदे,ग्रामसेवक नवनाथ पवार ,अतुल चव्हाण,मधुकर देशमाने,राजेभाउ कटारे,भारत गौंडर, अतुल सोळंके,अशोक काशिद, विठ्ठल महाजन, परमेश्वर नायगांवकर,सुनील काटकर, बाबा देशमाने,अनिल मांयदळे,हनुमान फपाळ, राजेभाऊ सोळंके, राज झोडगे,शिरिशकुमार रामदासी आदी उपस्थित होते.  अविनाश दळवे,राम घोड़के,अलीम सय्यद,तुषार देशमाने,अनिल मांयदळे अश्विन राउत सह दिंद्रुड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन माजलगाव, धारुर, वडवणी, परळी तालुक्यातील बहुतांश संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.





No comments