Breaking News

तेलगाव नाका ते नागपूर फाटा रखडलेले काम तात्काळ सुरू करा:-राजेंद्र आमटे राहुल टेकाळे


लवकरच नागरिकांनासह  तीव्र आंदोलन करणार 

बीड : बीड पिंपळनेर रोड वरील तेलंगाव नाका ते नागपूर फाटा काम मंजूर होऊन अनेक वेळा उदघाटन करण्यात आले परंतु गेली दोन वर्षांपासून  काम कधी होईल याची नागरी वाट पाहत आहेत. 
रस्त्याच्या दुरावस्था मुळे नागरिकांचे प्राण गमवावे लागले  अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापाळा म्हणून गणला जाणारा तेलगाव नाका ते नागपूर फाटा रास्ता मंजूर असूनही सुरू करत नव्हते परंतु नागरिकांच्या वारंवार मागणी मुळे, स्वाक्षरी आंदोलन,अनेकांच्या पाठपुराव्याने काम सुरू झाले.परंतु अचानक गुत्तेदाराला अवदसा आठवली व काम बंद केले तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा खांडे पारगाव,अंथवन प्रिंपी,उमरी,उमरद,जवळा, नागपूर,बीड पिंपळनेर रोडवरील सर्व गावातील नागरिकांनासह तीव्र आंदोलन करण्यात येईल ज्या गुतेदाराने काम रखडले त्या गुत्तेदार लायसन्स काळ्या यादीत टाकण्यात यावी.
No comments