Breaking News

आठवडी बाजार बंदचा फटका गोररिबांना बसतोय कोरोना व महागाईने सर्व सामान्य त्रस्त -सुरेखा जाधव

बीड : कोरोना काळ हा जणू गरीबांच्या जीववावर बेतताना दिसून येत आहे .एकीकडे महागाई चे चटके सर्व सामान्यांना सोसावे लागत असून त्यात कोरोना आ वासून समोर येत आहे त्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांनी आठवडी बाजार बंद  करून जणू एक प्रकारचे गोरगरिबांच्या उदर्निरवाह चा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा केला आहे. 

एकीकडे महागाई वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना ही वाढताना दिसून येत आहे कोरोना व महागाई या मध्ये सर्व सामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला  आली आहे .आता जीवन जगायचे कसे हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.मजूर करणाऱ्या मजुराला तर आपल्या रोजंदारी वर मजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरावी लागते मग ही माहागाई व कोरोना ने ही मजुरीचे काम हातातून जाताना दिसून येत आहे.

शेतकऱ्याने आपल्या शेतातील भाजीपाला व इतर पीक विकायचा कसा हा मोठा प्रश्न  शेतकऱ्यांना पडला आहे.केंद्र व राज्य सरकारने या सर्व सामन्याचे  प्रश्न लवकर सोडून जनतेच्या होत असणाऱ्या नुकसानिला राज्य सरकारने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असे आवाहन बीड च्या  समाजसेविका सुरेखा जाधव यांनी केले.
No comments