Breaking News

महिला महाविद्यालयात विज्ञान दिन संपन्न


परळी वैजनाथ : येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा गणित विभाग प्रमुख व संस्थेच्या संचालिका डॉ. विद्या देशपांडे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद महाविद्यालयाचे प्रा. एस.डी. डोंगरे उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ व्ही.बी. कवडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन कशासाठी साजरा केला जातो याचे सविस्तर विवेचन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डोंगरे यांनी विज्ञानविषयक सविस्तर मार्गदर्शन केले.  अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या संचालिका प्रा.डाॅ. विद्या देशपांडे यांनी विज्ञानामध्ये महिलांचा वाढता सहभाग ही आनंदाची बाब असल्याचे मत व्यक्त करताना सुनीता विलियम्स, कल्पना चावला इत्यादी अनेक वैज्ञानिक महिलांची उदाहरणे देऊन विद्यार्थिनींना प्रेरक ठरतील असे विचार मांडले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कवडे यांनी केले तर आभार प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. रोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. पी.व्ही. गुट्टे , संस्कृत विभाग प्रमुख प्रा.ए.एम. चव्हाण इतर प्राध्यापकवृंद व भौतिक शास्त्र विभागातील कर्मचारी श्री गोरख वाघमारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments