Breaking News

विड्याच्या जावयाची गदर्भस्वारी कोरोना महामारीने यावर्षी बंद !

संग्रहीत

कोरोनाने सगळे धास्तावले पण विड्याचे जावई मात्र खुश! 

गौतम बचुटे । केज 

कोरोनाने सर्वजण धास्तावले असताना केज तालुक्यातील विड्याचे जावई मात्र खुश आहेत. कारण यावर्षी कोरोनामुळे जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येणार नसल्याने जावई मंडळी खुश आहे.


 

केज तालुक्यातील विडा येथे मागील ऐंशी वर्षापासून गावात धुलिवंदनाच्या दिवशी गावातील एका जावयाला पकडून आणून त्यांना गाढवावर बसून गळ्यात चपलांचा हार घालून वाजत-गाजत व रंगाची उधळण करीत सर्व गावातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मिरवणुकी नंतर जावयास कपड्यांचा आहेर करण्यात येतो. मात्र  यावर्षी जिल्ह्यात लॉक डाऊन तसेच जमावबंदीचा आदेश असल्याने व वाढत्या कोणाचा संसर्ग रोखण्यासाठी गावकऱ्यांनी या वर्षी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दरवर्षी धास्तावलेली जावई मंडळी मात्र खुश आहे.

"आमच्या गावची ही जावई मिरवणुकीची पूर्वापार चालत आलेली परंपरा या वर्षी आम्ही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खंडित करीत आहोत. याचा आम्हाला खेद होत आहे. मात्र परिस्थिती तशी असल्याने हा निर्णय घेतला आहे."

        -- सुरज पटाईत (सरपंच) 

              विडा ता. केज

No comments