Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवीनारे आदरणीय कांशीराम - ऍड.राजरत्न उजगरे

परळी वै. : तमन्ना अगर सच्ची हो ,तो रास्ते निकलते है।तमन्ना अगर झुठी हो तो बहाने निकलते है। म्हणत बहूजन नायक मान्यवर कांशीरामजींनी बहूजन समाजाला शासनकर्ती जमात बनवण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं असे प्रतिपादन ऍड.राजरत्न उजगरे यांनी दि 15 रोजी तिरूपती कॉम्प्लेक्स टी.पि.एस. रोड परळी येथील केले. त्यांच्या कार्यालयात मा.कांशीरामजींची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवर साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित असलेले जयपाल कांबळे, अँड बी डी उजगरे,फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी कांशीरामजींच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच कांबळे म्हणाले की,कांशीरामजींनी वोट हमारा, राज तुम्हारा ही घोषणा दिल्या नंतर इंदिरा गांधींनी सर्वप्रथम भारतात इव्हिएम मशीन आणले.

आणि आज 85ट्क्के बहुजन समाजाच्या मताला ईव्हीएम मूळे महत्त्व राहिले नाही. जर बाबासाहेबांना अपेक्षित  बहुजन समाज राज्यकर्ती जमात बनण्याचे स्वप्न कांशीरामजींना अपेक्षित 85टक्क्यांची राजनीती वोटींग मशिन हटवल्या शिवाय यशस्वी होणार नाही. त्यासाठी मोठ्या संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असे सांगितले. कार्यक्रमास स्टूडेंट फॉर रिकन्स्ट्रक्शन  ऑफ सोसाइटी चे कपील चिंडालिया, आकाश देवरे, बालाजी ठोके सह आदिंची उपस्थिती होती.
No comments