Breaking News

शिरूर येथील अधिकारी अन् कर्मचार्‍यांचे बीडवरून अपडाऊनने जनतेचे हाल-गोकुळ सानप


रायमोहा : शिरूर तालुक्यात बहुतांषी अधिकारी हे प्रभारी असून ते फक्त झेंडावंदन असेल तरच मुखडा दाखवतात. मात्र एरवी ते कधीच हजर दिसून येत नाहीत. ग्रामीण भागातून येणार्‍या लोकांना दिवस-दिवस कार्यालयासमोर बसावे लागत आहे. तरी या गंभीर बाबीकडे माजी आमदार.जयदत्त क्षीरसागर,माजी आमदार.भीमराव धोंडे, आ.सुरेश धस, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे व जिल्हाधिकारी साहेब‌ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कु़ंभार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे बीड जिल्हा सरचिटणीस गोकुळ सानप यांनी केली आहे. 

पुढे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर गोकुळ सानप प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, शिरूर तहसीलच्या नायब तहसीलदारसह आदी कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहात नाहीत. यामुळे जनतेचे हाल होत आहेत. तसेच ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या पंचायत समितीत गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी बीडवरून अपडाऊन करत असल्याने जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्याच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर नसल्या कारणाने सर्वसामान्य जनतेची आडवणूक होत आहे. शिक्षणाचा तर खेळखंडोबाच झाला आहे. 

विद्यार्थी वार्‍यावर सोडून अनेक शिक्षक हे शहरात असतात. शिक्षक शाळेवर वेळेवर जात नाही त्यामुळे शिरूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचार्‍यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही त्यामुळे हे बीडवरून राजेशाही थाटात अपडाऊन करतात. तर या गंभीर बाबीकडे माजी आमदार.जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार.भीमराव धोंडे, आ.सुरेश धस, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे व जिल्हाधिकारी जगताप साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजितजी कुंभार यांनी लक्ष घालावे अशी मागणी भाजप विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे बीड जिल्हा सरचिटणीस गोकुळ सानप यांनी केली आहे.

No comments