Breaking News

लॉकडाऊन चा फटका सर्व सामन्यांना बसतोय लॉकडाऊनच्या निर्णयावर पुनर्विचार करा --सुरेखा जाधव


बीड : बीड जिल्ह्यात वाढता कोरोनाच्या पॉजिटीव्ह च्या आकड्यांमुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 26 मार्च ते 4 एप्रिल असा एकूण 10 दिवसाचा लॉकडाऊन चा निर्णय घेतला आहे .परंतू या निर्णयाने सर्व सामान्यांचे पार कंबरडे मोडन्याची वेळ आली आहे .आता सध्याचा काळात वाढती महागाई ने सामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आलेली आहे .दिवस भर काम करून पोट भरण्याचा प्रश्न सर्व सामान्याच्या समोर असताना हा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व सामान्य जनता हतबल होताना दिसून येत आहे. एक वर्ष उलटत नाहीत तोपर्यंत पुन्हा या ही वर्षी लोकडाऊन लागल्यामुळे जनतेची आर्थिक परिस्थिती आणखीन खालावेल व कोरोना मूळे न मरता भूकबळी होतील.शासन स्तरावर त्याची नियमाची अंमलबजावणी कडक करून जनतेला नियमाचे पालन कसे करता यईल हे पाहावे नसता या लॉकडाऊन मुळे जनता खूप दिवस घरात बसू शकत नाही याचा परिणाम प्रशासनाला भोगावा लागेल. 

त्यामुळे हा लावलेला लॉक डाऊन चा निर्णय जनतेच्या माथी मारला तो लवकर  त्याची मर्यादा कमी करून, कोरोनाच्या नियम कडक करून पूर्ववत करावे. कोणी मोलमजुरी करून ,कोणी मिस्त्री काम करून,कोणी पान टपरी चालवून तर कोणी लहान मोठे व्यवसाय करून जनता आपले पोट भरत आहे दिवस भर काम केले तर त्याला संध्याकाळी घरी लेकराबाळांना खायला घेऊन जातो .जर हे लॉकडाऊन असेच राहिले लहान लहान मुलंबाळ सुद्धा उपाशी मरतील.व्यपारी वर्गानाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांना मस्कची सक्ती करावी, सामाजिक अंतराचे नियमाचे पालन करण्यासाठी सक्ती करावी .परंतु हे लावलेला लॉकडाऊन कमी करण्याचा पुनर्विचार जिल्हाधिकारी यांनी  करावा अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्ती सुरेखा जाधव यांनी केली आहे.
No comments