Breaking News

२३ मार्च मराठा आरक्षण बलिदान दिवस

संग्रहीत

अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आ. आण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी मुंबई येथील विधानभवनावर "मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे" या व मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला एकाच छत्राखाली संघटित करून मुंबई येथे विधान भवनावर भव्य मोर्चा काढला होता.

   

संग्रहीत

  या मोर्चाला संबोधित करताना आण्णासाहेब पाटील म्हणाले होते की, "जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा आण्णा पाटील उद्याचा सूर्य पाहणार नाही" तत्कालीन सरकारने मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना केराची टोपली दाखवली याचाच राग मनामध्ये धरून बोलल्या प्रमाणे आण्णासाहेब पाटील यांनी २३ मार्च च्या पहाटे (सूर्योदयापूर्वी) स्वतःला गोळी झाडून आत्मबलिदान केले.  मराठा समाजाच्या विकासासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान करणारे आण्णासाहेब पाटील हे पहिले समाजभूषण होते. तेव्हा पासून आजपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने चालू आसलेल्या आरक्षण लढाईत ४२ समाज बांधवांनी आपला जीव गमावून आत्मबालिदान केले.

 गेली ४० वर्ष मराठा आरक्षण या विषयावर आपण सर्व स्व.आण्णासाहेब पाटील, स्व.आण्णासाहेब जावळे, स्व.देविदास वडजे, स्व.शांताराम कुंजीर, स्व.काकासाहेब शिंदे यांच्या सह शशिकांत पवार, राजेंद्र कोंढरे, नरेंद्र पाटील, विनायक मेटे, छत्रपती संभाजीराजे, विनोद पाटील, गणेश बजगुडे पाटील, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते, प्रवीण गायकवाड, इत्यादी सह असंख्य समाजबांधव व जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगव असो किंवा बीड जिल्ह्यातील मालेगाव यासारखे संपूर्ण गाव आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन करत आहेत. परंतु दुर्दैवाने राजकीय मंडळी आजही आरक्षणाचा तिढा सोडत नाहीत.

संग्रहीत

आण्णासाहेब पाटील ते काकासाहेब शिंदे असे बलिदानाचे सत्र मुंबई ते मराठवाड्यात पसरले लाखोंचे क्रांती मोर्चे झाली तरी देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. याचे दुःख वाटते. दुर्दैवाची बाब आशी की खऱ्या व सच्या आरक्षण आंदोलकांना ज्यांनी आंदोलने केली, काठ्या लाठ्या खाल्या, जेल भोगले आश्य मराठा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मागे सारून  समाजातील काही संधी साधू लोकांना हाताशी धरून आरक्षणाचे राजकारण व विषयांतर करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात राजकीय पुढारी करत असल्याचे दिसून येते. 

परंतु या बंडगुळणा आमचे सांगणे आहे  मराठा आरक्षणासाठी काठ्या लठ्या खाणारी व झेल भोगणारी आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, आण्णासाहेब पाटील ते काकासाहेब शिंदे यांच्यासारख्या असंख्य समाजबांधवांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विषयात दिशाभूल करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आरक्षण हा आमचा जिव्हाल्याचा विषय असुन पड पैसा व प्रसिद्धीसाठी आम्ही हे कदापि करत नाहीत. आरक्षण मिळे पर्यंत शांत बसणारे मराठे आम्ही नाहीत.  म्हणून समाजाशी कोणी किती प्रामाणिक राहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी "शिवक्रांती युवा परिषद" ही संघटना व संघटनेची आम्ही सर्व मावळे कायम कटिबध्द व प्रामाणिक आहोत. 

  आज २३ मार्च शहीद दीन इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या झाडून देशस्वतंत्रासाठी फासावर जाणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे आण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी यामहान क्रांतिकारकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून मराठा आरक्षण व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक राहू न कायम प्रयत्न करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.


    आपला 

 गणेश बजगुडे पाटील

  संस्थापक अध्यक्ष

शिवक्रांती संघटना महाराष्ट्र

संग्रहीत
No comments