Breaking News

परळी वकीलसंघाकडून ॲड. सायस मुंडे व ॲड. सोनिया मुंडे (फड) यांचा सत्कार

परळी : श्री संत भगवानबाबा महाशक्ती सेवा संस्था महाराष्ट्र,भगवान बाबा राज्यस्तरिय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला होता. यात  ॲड.सायसराव रामराव मुंडे  यांना न्याय क्षेत्रात उत्तम कार्य केल्यामुळे विधी व न्याय भगवानबाबा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच श्री.संत भगवान बाबा महाशक्ती सेवा संस्थेच्या कायदा सल्लागार पदी नियुक्ती पत्र देण्यात आले होते. व ॲड.सोनिया सायसराव मुंडे(फड)यांना सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्यामुळे  भगवानबाबा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता  व त्यांची  कायदा सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. 

या निमित्त परळी वकील संघाच्या वतीने मंगळवार दि.२ मार्च रोजी ॲड.सायसराव मुंडे व ॲड.सोनिया सायसराव मुंडे (फड)यांचा सत्कार करण्यात आला. श्री संत भगवानबाबा महाशक्ती सेवा संस्था, महाराष्ट्रर राज्य स्तरिय विधी कायदा व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभ प्रसंगी परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. एम. सातभाई, ॲड. व्हि. बी. नागरगोजे, ॲड. आर. व्ही. गित्ते,  ॲड. एच. व्हि. गुट्टे, ॲड. पी. आर. गित्ते, ॲड. टि. के. गोल्हेर, व्ही. एस. फड, ॲड. पि. एच. मराठे, ॲड. डि. पी. कडबाने, ॲड. धुमाळ, ॲड. छाया होळबे, ॲड. ए. जी. जोशी, ॲड. अनिलमुंडे, ॲड. एजि. साळवे, ॲड. दत्तात्रय आंधळे, ॲड. आर. व्हि.देशमुख, ॲड. इम्रान खान,  ॲड. राहुल सोळंके, ॲड. अर्जून सोळंके, ॲड. केशव अघाव, ॲड. आर. बी. जाधव, ॲड.बालाजी कराड, ॲड. एस. जि. फुटके, ॲड एस.आर.शेख, ॲड. धनाजी कांबळे, ॲड. आर. एस. डिघोळे, ॲड. जि. एस. मुंडे, ॲड.प्रवीण फड, ॲड. विश्वाससिरसाट, ॲड. एफ. एस. खान, ॲड. ए. एस. खान, ॲड. शेख शफिक, ॲड. बुध्दरत्न उजगरे वकील संघातील सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments