Breaking News

महावितरणच्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवण्याचे धाडस करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाणांची भाजपाने पाठराखण करावी

शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांची मागणी


अंबाजोगाई  : बेकायदेशीर वीजबील वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवण्याचे धाडस करणारे चाळीसगाव जि.जळगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. 

           शेतीपंपाची शेतकऱ्यांकडे थकबाकी नाही.मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक 8651/2011 मध्ये याबद्दल निवाडा झाला आहे.माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतची सविस्तर माहिती आहे. शेतीपंपाच्या 24 तास वीज पुरवठ्यासाठी 16 तासाच्या वीज बीलाची अग्रीम रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली असतानाही शेतीपंपाला फक्त आठच तास वीजपुरवठा केलेला आहे. ही बाब उच्च न्यायालयाने मान्य करून वीज कायदा 2003 मधील तरतुदींनुसार कलम 56(1)नुसार ग्राहकाला नोटीस दिल्या शिवाय वीज कनेक्शन तोडू नका असे बजावले आहे.

याबाबतचा हिशोब वीज नियामक आयोगाकडे प्रलंबित असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेती पंपाचे वीज कनेक्शन न तोडण्याची विधानसभेत घोषणा केल्यानंतर जाणिवपूर्वक काँग्रेसी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतीपंपाची बेकायदेशीर वसुली करण्याचे आदेश कसे दिले? वीज कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकांना 15 दिवसाची पूर्वसूचना देणे बंधनकारक असतानाही महावितरणचे अधिकाऱ्यांनी शेती पंपाचे वीज कनेक्शन का तोडले ? यांच्या चौकशीची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करून आमदार मंगेश चव्हाण यांची पाठराखण करावी असे आवाहन कालिदास आपेट यांनी केली आहे.

No comments