Breaking News

केज शहरात दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण..!


केज शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींनी आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन करून घ्यावी: हारूनभाई  इनामदार

केज : केज शहरातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींनी आपली वैयक्तिक नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन केज नगरपंचायत चे गटनेते मा.हारूनभाई इनामदार साहेब यांनी केले आहे.

जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड, सहाय्यक आयुक्त साहेब डॉ. सचिन मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बंधू-भगिनीं साठी "दिव्यांग साथी" नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंदणी जीवन शिक्षण निवासी अस्थिव्यंग विद्यालय, शिक्षक कॉलनी,बीड रोड, केज येथे करून  घ्यावयाची आहे.जिल्हा समाज कल्याण विभाग बीड अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या"दिव्यांग साथी"ऑनलाईन नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत असून, या नोंदणीमुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्ती या महाराष्ट्र शासनाशी जोडला जाणार आहे. 

यापुढील सर्व सुविधा व उपक्रम याच "दिव्यांग साथी" योजनेअंतर्गत राबविण्यात येणार असून शहरांतर्गत येणाऱ्या  सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी ऑनलाइन नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येताना दिव्यांग बंधू-भगिनीनी पुढील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे पासपोर्ट फोटो, आधार कार्ड ,मतदान कार्ड, दिव्यांग मेडिकल सर्टिफिकेट, बँक पासबुक झेरॉक्स, दिव्यांग यू डीआयडी कार्ड.इत्यादी कागदपत्रे घेऊन जीवन शिक्षण निवासी अस्थिव्यंग विद्यालय ,शिक्षक कॉलनी ,बीड रोड, केज येथे येऊन स्वतःची दिव्यांग नोंदणी करून घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक श्री. विनायक ठोंबरे सर यांनी केले आहे.

No comments