Breaking News

आ. प्रकाश सोळंकेंना मंजरथ रस्त्याचा पडलाय विसर - नवीद सिद्दिक़ी


खडीचे ढिगारे आणि धुळीच्या रस्त्याने जनता वैतागली !

माजलगाव :  येथून मंजरथ गावाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी हा रस्ता आपण लवकरच तयार करून देणार आहोत, असे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडला असून या रस्त्यावर खडीचे ढिगारे गेल्या अनेक महिन्यांपासून पडून असून असल्याचे एआयएमआयएम पक्षाचे युवानेते नवीन सिद्दिकी यांनी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. 
पत्रकात नमूद केले आहे की, माजलगाव पासून मंजरथ गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर देवस्थान, कब्रस्तान, नवीन इदगाह आणि मंजरथ येथील त्रिविक्रम महादेव मंदिर आहे. या सर्व ठिकाणी जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे.
युवानेते नवीद सिद्दिकी

दररोज या रस्त्यावरून वाहनासह लोकांना कच्च्या रस्त्यावरून पायपीट  करत जावे लागते. कच्च्या रस्त्यामुळे पावसाळ्यात चिखलाने तर उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीमुळे जनतेचे हाल होत आहेत. या सर्व बाबी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना भेटून जनता वारंवार सांगत आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी हा रस्ता लवकरच चांगला तयार करून देण्याचे वचन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे. 
त्यांच्या विसरभोळेपणामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अतोनात हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. परंतु याकडे आमदारांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला असून रस्त्याचे काम करण्यासाठी आदर्श वेळ आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि रस्ता चाळीस फूट रुंद करण्यात यावा. अन्यथा पंधरा दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा एआयएमआयएम पक्षाचे युवानेते नवीन सिद्दिकी यांनी दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

No comments