Breaking News

लॉकडाऊनच्या नावानं बोंब ठोकून ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी होळीचा उत्सव केला साजरा

बीड  :  करोनाच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाऊन केले. लॉकडाऊनमुळे मात्र होळी व धुलीवंदन या आनंदाच्या उत्सवावर विरजण पडले. बीड तालुक्यातील ग्रामीण भागात बच्चे कंपनीने लॉकडाऊनच्या नावाने बोंबा मारून होळीचा उत्सव साजरा केल्याचे दिसून आले. 

गतवर्षी कोरोनाचे संकट आणि त्यातून उदभवलेल्या लॉकडाऊनमुळे देशरात सण -उत्सव साजरा करण्यासाठी अनेकांच्या मनात भीतीयुक्त आनंद अशी द्विधा होती. कोरोनाचे जस- जसे सावट दूर होऊन परस्थिती पूर्वपदावर येत असताना यंदा तरी सण - उत्सव जल्लोषात साजरा करता येईल अशी आशा प्रत्येक नागरिकांना होती. देशभरात होळीचा उत्सव उत्साहाने साजरा होत असताना बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे होळी व धुलीवंदनाचा उत्सव घरात बसून साजरा करावा लागत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

व्हीडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

मात्र नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याने कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासन - प्रशासनाची चिंता वाढली. राज्यातील काही जिल्ह्यात आणि शहर लॉकडाऊन करण्यात आले असून शाळाही बंद करण्यात आल्या. गेल्या वर्षभरापासून बंद- चालूचा लपंडावाचा खेळ संपता संपत नसताना बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला. त्यातच होळी व धुलीवंदन हा रंगाचा उत्सव नाईलाजाने पुन्हा घरात बसून साजरा करावा लागतोय. त्यामुळे   लॉकडाऊनला कंटाळलेल्या बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील  चिमुकल्यांनी लॉकडाऊनच्या नावानं बोंबा मारून शिंमगा साजरा केल्याचे दिसत होते.

No comments