Breaking News

बहुजन समाज पार्टीने घातला तहसीलदारांना घेराव


इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक - ऍड.अमोल डोंगरे 

माजलगाव : केंद्र व राज्य सरकार शेतकरी,कामगार यांच्या विरोधात जुलमी कायदे करुन अन्याय केलेला आहे. तर डिझेल,पेट्रोल,सिलेंडरची इंधनवाढ करुन सर्व सामान्यांची पिळवणूक करत आहे.त्याचबरोबर महिलांवर होत असलेल्या अन्याय नियंत्रित करुन अन्यायग्रस्ताना न्याय देण्यात यावा,व विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नसून विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात येत आहे.तसेच या देशातील असलेले मुळ रहिवाशी आदिवासी,कोळी समाजास जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत नसून त्यांच्यावर लोकशाहीमध्ये अन्याय होत आहे.त्या आदिवासी समाजास जात प्रमाणपत्र देण्यात यावे या सह विविध मागण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हाअध्यक्ष ऍड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तहसीलदार यांना घेराव घालण्यात आला.

डिझेल पेट्रोल इंधन वाढ कमी करण्यात यावी,कृृषी कायदे व कामगार कायदे रद्द करण्यात यावे,वाढीव वीजबिल माफ करण्यात याव,गायरान जमिनीचे पंचनामे करुन एक इ ला नोंद घेण्यात यावी, आदिवासी,कोळी समाजास जातीचे प्रमाणपत्र देण्यात याव,विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी,महिलांवरील अन्यायातील आरोपींना कठोर शासन करण्यात यावं,स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगाव शाखेची मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी व बँकेतील दलालांना पा बंद करण्यात यावा व मौजे फुलेपिंपळगाव येथील समाज कंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला झेंडा जाळला त्या समाजकंटकास अटक करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी.

या मागण्यांसाठी तहसीलदार माजलगाव यांना बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आला.यावेळी अरविंद लोंढे विधानसभा अध्यक्ष माजलगाव, चंदरलाल बनगे जि.सचिव,हरिभाऊ साळवे कार्यालयीन सचिव,राजेंद्र डोंगरे , सत्यपाल डोंगरे , सुभाष कीर्तेे, रावण कीर्तेे, राजाराम कीर्तेे, संभाजी कीर्तेे, लहू सुरवसे, भानुदास शेळके, रंजना गवळी,यशोदा धुमाळ,पुष्पा गवळी,पेंटर पंकज ,संजय डोंगरे, असित डोंगरे आदी उपस्थीत होते.

No comments