Breaking News

हिंडफीऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस रस्त्यावर !


ऑन
ड्युटी चोवीस तास ; चेक पोस्ट वरचे कर्मचारी उन्हातान्हात !

गौतम बचुटे । केज

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाउन सुरू केला आहे. बाहेरून जिल्ह्यातून येणाऱ्या जाणाऱ्यावर निर्बंध लावण्यासाठी जिल्हा हद्दीवर चेक पोस्ट उभारले आहेत. मात्र चेक पोस्टवरच्या कर्मचाऱ्यांना ना निवारा ना सावली ! उन्हातानात उभा राहून त्यांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून केज तालुका हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी चेक पोस्ट लावले आहेत. त्यात हनुमंत पिंपरी आणि मांगवडगाव या उस्मानाबाद जिल्ह्यतून येणाऱ्या रस्त्यावर पोलीस आणि महसूल विभाग व त्यांच्या मदतीला आरोग्य कर्मचारी व शिक्षक, ग्रामसेवक हे खडा पहारा देत उभे आहेत. मात्र त्या कर्मचाऱ्यांना ना बसण्यासाठी सावली आहे ना काही सुविधा. त्याच बरोबर जर कर्तव्यावर महिला कर्मचारी असतील तर त्यांना नैसर्गिक विधीसाठी प्रसाधन गृह तसेंच पिण्याच्या पाणी देखील उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सिमेवर ऑन ड्युटी चोवीस तास असलेल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोईसुविधा पुविण्यात याव्यात. ही मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.


No comments