Breaking News

सोयाबीनच्या गंजीला आग लावून केले ८५ हजाराचे नुकसान


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यतील आनेगाव येथे काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला एकाने आग लावून देत ८५ हजार रु. चे नुकसान केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ मार्च रोजी युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आनेगाव ता. केज येथील प्रचंड सोपान हंडीबाग यांच्या गावखोरीचे शेत नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व्हे नं १ मध्ये सोयाबीन काढून त्याचे खळे करण्यासाठी गंज लावून ठेवलेल्या गंजिला बाळासाहेब छब्बु हंडीबाग रा. आनेगाव याने आग लावून जाळून नष्ट केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यात सुमारे ८५ हजार रु. चे सोयाबीन जळून खाक झाले. 

या प्रकरणी प्रचंड सोपान हंडीबाग यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस स्टेशनला गु. र. नं. ४५/२०२१ भा. दं. वि. ४३५ व ५०६ नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला असून पोलीस नाईक पिंपळे हे पुढील तपास करीत आहेत.


No comments