Breaking News

पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश ; व्यापाऱ्यांनी मानले आभार


लाॅकडाऊन शिथील ; सर्व दुकाने आता दुपारी १ वा. पर्यंत सुरू राहणार 

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीला यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेल्या एका आदेशान्वये जिल्हयातील लाॅकडाऊनच्या वेळेत शिथीलता दिली आहे. आता उद्यापासून सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वा. पर्यंत खुली राहणार आहेत.  दरम्यान, याबद्दल व्यापाऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

  वाढत्या कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर केला होता. या दरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचा वेळ सकाळी ७ ते ९ असा दिला होता, परंतु हा वेळ व्यापारी आणि ग्राहकासांठी अतिशय गैरसोयीचा असल्याने वेळ वाढवून द्यावा अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज एक आदेश काढून उद्यापासून म्हणजे ३० मार्चपासून सकाळी ७ ते दुपारी १ वा. पर्यंत लाॅकडाऊन शिथील करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी दिली आहे. 

दरम्यान, लाॅकडाऊन मध्ये शिथीलता मिळाली असली तरी व्यापारी, ग्राहक व सर्व नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर यासह कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.


No comments