Breaking News

अवकाळी गारपिटीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या : राजेंद्र आमटे


सरकारला शेतकऱ्यां ऐवजी हप्ता वसुलीचीच  जास्त चिंता 

बीड : शेतकरी आधी करोनामुळे मारला गेला,परत अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आणि आत्ता शेतकरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना च्या शेतात उभी असणारी  ज्वारी, आंब्याच्या बाग,डाळींबाच्या बाग,मोसंबी, गहू,हरभरा, मका,टरबूज,उन्हाळी बाजरी इतर पिकाचे अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरकारचे मंत्री स्वतःचे पोटाची खळगी भरण्यासाठी हप्ते वसुलीत दंग आहेत. 

          शेतकरी फक्त मता पुरता वापर करतात निवडणूक आल्या की शेतकरी पुत्र जागे होतात परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले तर कोणीही काहीच बोलत नाही हे दुर्दैव आहे तात्काळ शेतकऱ्यांनच्या अवकाळी पावसामुळे व गारपीट मुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणी करीता शिवसंग्राम अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या वेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,प्रशांत डोरले,विठ्ठल ढोकणे,अतुल लंगोरे,तुषार शेळके,योगेश जाधव आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
No comments