Breaking News

आँल इंडिया पँथर सेनेच्या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावे - संदिपभाऊ जाधव


कडा  : आँल इंडिया पँथर सेना बीड जिल्ह्याच्या वतिने पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या दि ०१ एप्रिल२०२१रोजी दुपारी ठिक १२ वाजता शासकीय  विश्रामगृह बीड या ठिकाणी आयोजित केली असून जिल्हयातील दलितांवरील वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी तसेच मोर्चा बांधणी व जिल्हयातील वाढते संघटन लक्षात घेता काही फेरबदल या बैठकीत होणार आहे. 

    या बैठकीला प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.विनोद भोळे साहेब, मराठवाडा अध्यक्ष मा.बंटीभाई सदाशिवे, मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनवणे हे आहेत तसेच बीड जिल्हाध्यक्ष मा.धम्मानंद (भाऊ) वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे. तरी आष्टी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आष्टी तालुकाध्यक्ष संदिपभाऊ जाधव यांनी केले आहे.

No comments