Breaking News

पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांनी मारला छापा

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील कोरेगाव येथे पोलिसांनी छापा मारून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या तिघांना पकडले. जुगाराचे साहित्य आणि २ हजार ५६० रुपये जप्त केले. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी १७ मार्च रोजी ५:३० वाजेच्या सुमारास सावंतवाडी रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर छापा मारला. या वेळी बालासाहेब सुखदेव गालफाडे, प्रकाश विश्वनाथ गालफाडे (दोघे रा. चिंचोलीमाळी ता. केज), सुरेश भीमराव पौळ (रा. पालम जि. नांदेड ह.मु. कोरेगाव ता. केज) या तिघांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि २ हजार ५६० रुपये जप्त केले. पोलिस नाईक सिद्धेश्वर हरिभाऊ डोईफोडे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जमादार दिनकर पुरी पुढील तपास करत आहेत.
No comments