Breaking News

केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे महागाई: कमल निंबाळकर

बीड : केंद्र सरकारचे योग्य नियोजन नसल्याने सतत इंधन दरवाढ होत असून त्यातून महागाईमध्ये भर पडत आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले असून महागाई नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी मंगळवारी (दि.२) निषेध व्यक्त केला.

भाजप सरकारच्या काळात महागाईत मोठी वाढ झाली आहे. मोदी सरकारने सामान्यांना विकासाची स्वप्ने दाखवून पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र, महागाई रोखण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीने सामान्यांचा जीव जेरीस आला आहे. त्यामुळे वाहने वापरावीत की नाही, असा प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे ही स्थिती ओढावली असून जनता कदापि माफ करणार नाही, असा इशारा कमल निंबाळकर यांनी दिला. इंन दरवाढ मागे घेऊन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करावा व शेतमालाला अधिकाधिक भाव द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केली.

No comments