Breaking News

बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

कनक इंटरप्राईजेसवर कलम 336 प्रमाणे कायदेशीर कारवाई करा-वंचित बहुजन आघाडी

बीड :  बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने कनक इंटरप्राईजेसच्या माध्यमातून बीड शहरांमधील साठलेला सुका कचरा ओला कचरा हे मजुरांच्या मार्फत उचलले जाते यामध्ये रस्ते व गटारा मधून काढलेला गाळ व कचरा रस्त्यावर दोन ते तीन दिवस तसाच राहत आहे. त्याच परिस्थितीमध्ये ठेवला जात आहे. संबंधित गाळ व कचरा रस्त्यावरून वाहतूक करत असताना ज्या मार्गाने वाहत जाईल त्या मार्गाने गाळ सांडत जातो व त्याची दुर्गंधी पसरते यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीमंडी मधील कचरा आहे त्या स्वरूपात असून त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते या ठिकाणचा कचरा कनक एंटरप्राइजेस कडून उचलला जात नाही. 

कनक इंटरप्राईजेसच्या माध्यमातून घनकचरा कामासाठी असणाऱ्या मजुरांचे कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर होत नसून कमी प्रमाणात दिले जात आहे. तसेच त्यांचे भविष्य निधी व त्यासंबंधीच्या इतर कलमान्वये खाते उघडणे बंधनकारक असते परंतु मजुरांची व कर्मचारी यांचे बँक खाते उघडले आहे का याची खात्री मात्र नगरपालिकेने केलेली नाही. त्यामुळे सदरील ईपीएफ हा कनक इंटरप्राईजेसच्या नावाने भरला जातो. तो संबंधित मजुरां पर्यंत पोहोचला जातो का? याची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कनक एंटरप्राइजेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व मजुरांचे बँकेमध्ये अकाऊंट उघडून  त्यांना द पेमेंट ऑफ वेजेस अॅक्टनुसार पगार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

बीड शहरामध्ये इंटरप्राईजेस मार्फत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 39000 घरातून डोअर तो डोअर 51 रुपये प्रति महिन्याने ओला कचरा व सुका कचरा संकलित करण्याचे काम सुरू आहे. परंतु वास्तविक पाहता एवढ्या घरातून कचरा संकलित केला जात नाही सदरील घरांची संख्या ही अंदाजे टाकून नगरपालिकेतून सदर कनक इंटरप्राईजेस हे निधी हडप करत आहेत. तसेच ओव्हर टाईम असल्याचे कामे सांगून नगरपालिकेकडून निधी हडप केला जात आहे.

 या प्रकरणी चौकशी करण्यात यावी तसेच मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी केलेल्या करारनामाप्रमाणे व मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नियम अटी प्रमाणे काम करत नसल्याचे दिसून येत.  व कनक इंटरप्राईजेसवर इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केल्यामुळे कलम 336 अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे केली. कनक एंटरप्राइजेस वर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात येतील असा इशाराही दिला आहे.
No comments