Breaking News

शेतकऱ्यांच्या तक्रारीची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतली दखल : उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यास दिली तंबी


गोटेगाव येथील शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करून लाभ देण्याचा आदेश

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील गोटेगाव येथील शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा अंतर्गत रब्बी हरबरा या पिकासाठी अर्ज करूनही त्यावर उचित कार्यवाही न झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यतील गोटेगाव येथील शेतकरी बालासाहेब बोराडे आणि इतर शेतकऱ्यांनी दि.१८ फेब्रुवारी रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यंच्याकडे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत रब्बी हंगामातील हरबरा बीजोत्पादन घटकासाठी दि. २२ नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज केला होता. परंतु मोटेगाव येथील ग्राम कृषी संजीवनी समितीने त्यावर कार्यवाही केली नाही आणि लाभार्थी शेतकऱ्यास लाभ दिला नाही. म्हणून त्यांनी तक्रार केली होती. 

त्या तक्रारींची दखल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घेतली असून; त्या संदर्भात त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई व तालुका कृषी अधिकारी यांनी गावातील लाभार्थी या सर्वाचे अर्ज त्वरीत ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठक घ्यावी आणि जर सर्व अर्ज योग्य असतील तर ते नाकारता येणार नाहीत. या बाबत समितीस अवगत करावे. जर काही अर्जात त्रुटी असतील तर ते ठरावामध्ये नमुद करावे किंवा अर्जावरील आक्षेप असतील तर ते लिखीत स्वरुपात ठरावात घ्यावे.

 अन्यथा ते अर्ज मंजुर करुन त्वरीत त्या सर्व अर्जाना पुर्वसंमती मिळेल अशी त्वरीत कार्यवाही कृषि सहाय्यक व समुह सहाय्यक यांच्या मार्फत करण्यात यावी. तसेच यात काही अडचणी असतील तर आपल्या स्तरावरुन एक प्रतिनीधी पाठवुन ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठक बोलवावी. त्या बैठकीचा संपुर्ण अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा. या नंतर अशा प्रकारच्या तक्रारी कार्यालयास येऊ नयेत याची दक्षता अधिकारी संबधित क्षेत्रिय कर्मचारी यांनी घ्यावी. अशी तंबी पत्राद्वारे उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिली आहे. दरम्यान स्थानिक स्तरावर काम करताना करताना कृषी सहाय्यक व समूह कृषी सहाय्यक यांना स्थानिक लोकप्रतिनिधी हे त्रास देत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत
No comments