Breaking News

जागेच्या किरायाच्या वादावरून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन


पात्रुड येथील घटना ; आरोपी स्वत:  पोलीस ठाण्यात हजर

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किराया वरून  दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवार रोजी मोठ्या भांडणात झाले लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आरोपी स्वत:  पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

मयत शेख इर्शाद 

    माजलगाव पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पात्रुड येथे प्लाँट मध्ये असलेल्या किरायाचा  वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून भांडण होत असे. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघा भावात घरीच जोरदार भांडण झाले. दोघा भावांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भांडणात शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याचा धारदार गुप्तीने पोटात खुपसुन खून केल्याची घटना घडली. असुन आरोपी भाऊ स्वत: माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

      या भांडणात आई एका जनाच्या बाजूने तर वडील एकाच्या बाजूने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस तात्काळ हजर झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संदर्भात मयताच्या पत्नी च्या फिर्यादी वरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

No comments