Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील सर्व शिवालय बंद

शिवालय मंदिर परिसरात शुकशुकाट

माजलगाव :  यावर्षी पुन्हा कोरोनाचा वाढता प्रारदृर्भाव पाहता शासनाने सुरक्षितेच्या दृष्टीने महाशिवरात्री निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याने माजलगाव शहरासह तालुक्यातील सर्व शिवालय बंद ठेवल्याने शिवालय मंदिर परिसरात  शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मागच्या एक महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील कोविड १९ या महामारीने आपला फास आवळण्यास सुरू केल्याने संसर्ग रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार ,मोर्च, आंदोलन,सभा,धार्मिक स्थळे आदी ठिकाणी होणाऱ्या गर्दची ठिकाणे पुढील काही दिवसां साठी बंद ठेवली आहेत.  

त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात साजरी होणारी महाशिवत्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने माजलगाव शहरासह तालुक्यातील शिवमंदिरे भावीकांना दर्शनासाठी बंद ठेवणाचा निर्णय घेतला, त्या आनुषंगाने सर्व शिवालय मंदीराच्या पुजारी व विश्वस्तांना तालुका प्रशासनाने शिव मंदीरे बंद ठेवण्याच्या सुचना दिल्यामुळे माजलगाव शहरातील व तालुक्यातील शिव मंदीरात शुकशुकाट दिसून येत आहे तालुक्यातील केदारेश्वर,मंगलनाथ ,शिदेश्वरव शुक्लतीर्थ लिंमगाव  येथील  शिवमंदिरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवली आली होती त्या मुळे  शिवभक्तांत उदासीनता दिसून आली तर तालुक्यातील शिवमंदिरात शुकशुकाट पहावयास मिळाला आहे. 

No comments