Breaking News

अवैध वाळू उपसा माफियांवर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा शेकाप लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करणार : भाई दत्ता प्रभाळे

बीड : आज बीड निवासी जिल्हाधिकारी साहेब संतोष राऊत साहेब यांना निवेदन देत जिल्हयात बीड तालुक्यातील अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जातोय स्थानिक पोलीस ठाण्यायांचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड तालुक्यातील सिंदफना, तुकडेमोडी नदी पत्रातून नागापूर, ब्रम्हपूर, राक्षस भुवन, कुक्कडगाव, भाटसांगवी,कोपरा या ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असतांना देखील महसूल अधिकारी बघ्याची भुमिका घेत असल्याने वाळू माफिया रात्रंदिवस हा वाळू तस्करीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणाऱ्या एकही टिप्परला नंबर नाही, ही गंभीर बाब आहे, या विणानंबर गाडीने एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर धडक देऊन निघून गेले तर याला कोण जबाबदार असेल? त्याला कोणत्या पुराव्याने पकडायचे? गाडीची ओळखच नसल्यामुळे नंबर नसेल तर कोणाची तक्रार करायची.

सध्या सुरू असलेला हा तांडव कोणाच्यातरी निष्पाप जिवावर उठणार आहे याला जबाबदार कोण राहील? या वाळू माफियांना कोणाचेही भय नाही याचे कारण काय? या वाळू तस्करांवर महसूल प्रशासन यांचा वरदहस्त आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची वाळू माफियांची मिलीभगत आहे की  काय ? असा प्रश्न शेकाप व या भागातील ग्रामस्थांना वाटत आहे. तरी मा.जिल्हाधिकारी साहेबानी सर्व वाळू माफियांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड,अड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप च्या वतिने लोकशाही मार्गाने तिव्र रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेकाप चे भाई दत्ता प्रभाळे,भाई भिमराव कुटे,भाई मुकूंद शिंदे ,भाई शरद वाघमारे,भाई गोरख घोडके,भाई माऊली घोडके, भाई अशोक जाधव, सोनवणे प्रविण ,ग्रामस्थ व शेकाप पक्ष बीड तालुका कमिटीने दिला आहे.

No comments