Breaking News

मोकाट जनावरे दावणीला बांधा ; नाहीतर नगरपंचायत करणार जप्त !

संग्रहीत

शिरूर कासार : शिरूर कासार नगर पंचायतच्या वतीने वांरवार सांगुनही जनावरांचे मालक जनावरे हे मोकाट सोडत आहेत.त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतुकीची पार कोंडी होत आहे. व स्वच्छतेची समस्याही निर्माण होत आहे. संशयित मोकाट जनावरांच्या मालकावर शिरुर पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.माञ तरीही जनावरांच्या मालकाना कसलेही गांभिर्य नसल्याचे निर्दशनास आहे.तरीही सात दिवसात जनावरे घेऊन त्यांचा योग्य तो बंदोबंस्त नाही केला तर जप्तीची कार्यवाही करणार आसल्याचे नगरपंचायतने जाहीर आवाहनाद्वारे म्हटले आहे.

नगरपंचायत शिरुर अंतर्गत शहरामध्ये बऱ्याच दिवसापासुन मोकाट जनावारे फिरत आहेत.या मोकाट फिरत आसलेल्या जनावरांमुळे शहरातील व्यापारी,नागरीक, शेतकरी, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आसल्याचे वांरवार नगरपंचायतीस तक्रारी प्राप्त होत आहे.तरी शहरातील मोकाट जनावरांच्या मालकांना आवाहन करण्यात येते की सात दिवसामध्ये म्हणजेंच ३० मार्च प्रर्यंत आपले मालकीचे मोकाट जनावरे आपल्या ताब्यात घेऊन त्यांचा योग्य तो बंदोबंस्त न केल्यास त्यांना जप्त करुन नगरपंचायत पुढील योग्य ती कारवाई करेल यांची नोंद घ्यावी.

जप्त केलेली जनावरे सेवाभावी संस्थाना घेता येणार!

शहरामध्ये मोकाट फिरत आसलेली जनावरे नगरपंचायतने जप्त केल्यानंतर ज्या सेवाभावी संस्थाना,व्यक्तीना जनावारे सांभाळायचे आसतील त्यांना काही अटी व शर्तीच्या आधीन राहुन मोफत ताब्यात देणार.

-किशोर सानप,

मुख्याधिकारी नगरपंचायत शिरुर कासार

No comments