Breaking News

केज अंबाजोगाई रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू

गौतम बचुटे । केज 

केज ते अंबाजोगाई रोडवर होळच्या पुढे कोदरी पाटी जवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरिणाला अज्ञात मोटार सायकलने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

या बाबतची माहिती अशी की, दि २६ मार्च शुक्रवार रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान केज ते अंबाजोगाई महामार्गावर होळ पासून पुढे कोदरी पाटी जवळ एका अज्ञात दुचाकीने मादी जातीच्या हरिणाला धडक दिली. पाच हरणाचा कळप हा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यातच हरीण मृत्यूमुखी पडले. सदर घटना अंबाजोगाईकडे जाणारे पत्रकार गौतम बचुटे यांनी अपघाताची माहिती धारूर वनविभागाचे वनाधिकारी मुंडे व धस यांना दिली.
No comments